Episode 510 as on 26th May 2026

Episode 510 as on 26th May 2026

May 27, 2026 · 1h 12m

About this episode

The episode discusses the nature of happiness, love, and devotion in spirituality.

Guru Shishya Sukhanandsamwad as on 26th May 2026 सुप्रभात , सुखाची इच्छा नैसर्गिक आहे पण या सुखाला स्वार्थाची जोड मिळाली तर सुखाला बाधा व दु:खाची प्राप्ती निश्चित आहे. निर्हेतुक प्रेमाच्या देवघेवीत मिळणारे सुख नैसर्गिक व अक्षय्य तर असतेच पण ही देवघेव प्रभूंच्या ठायी असलेल्या देवत्वाची प्रचितीही आणून देते. ही देवप्रेमाची महती आहे. या देवाणघेवाणीतच भक्तिचा उगम आहे आणि हीच आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे . जय परमानंद 🙏🙏🙏 सुप्रभात , बहुजनहिताकरता दत्तप्रभूंनी कार्य सुरू केले. या कार्याचा उद्गम त्यांच्या अंतःकरणात होता. पांडुरंगाने कार्यात प्रवेश केला आणि आनंदाला उधाण आले. प्रेमीजन खेळाचे सुख घेऊ लागले पण बाहेर प्रकट होणाऱ्या आनंदाच्या मूळाचा शोध घ्यायचा प्रयास कोणी केला नाही . ही यातायात नको होती. म्हणून देव मिळाला पण कळला मात्र नाही. मूळाचा शोध लागला तरच आपल्या अंतःकरणातल्या प्रभूंची भेट होण्याची शक्यता आहे. जय परमानंद 🙏🙏🙏 सुप्रभात , भक्तिमार्ग हा जिध्दीचा विषय नाहीच तर तो ध्यासाचा विषय आहे. व्यवहारात यश मिळावे म्हणून जिध्द केली जाते . ही जिध्दच सुखदु:खाचे मूळ आहे. भक्तिमार्गात ध्यासाचे रुपांतर छंदात झाले की आनंदाचा अनुभव आहे . प्रभूंचा छंद खेळातील प्रेम अनुभवण्याचा आहे. खेळाचे रुप बदलले तरी प्रभू त्या बदलत्या रुपाशी जुळवून घेतात कारण ते प्रेमाच्या छंदात रमलेले आहेत…

People in this episode

Host: Saurabh Kapoor

Topics covered

Keywords

More episodes of Guru Shishya Sukhsamwad

Explore listener stats, chart rankings, contacts and more on the Guru Shishya Sukhsamwad podcast page.