
This episode discusses overcoming stage fear and the importance of choosing the right person to accompany you when giving a speech.
भाषण करायला जाताना सोबत कोणाला न्यावे? ही एक चूक तुमचे संपूर्ण भाषण बिघडवू शकते! 🤫👇 भाषणाची वेळ जवळ आली की छातीत धडधड व्हायला लागते? स्टेजवर जाण्यापूर्वी एक अनामिक भीती सतावत असते. 'आपले भाषण चांगले होईल का?', 'आपली फजिती तर होणार नाही ना?' अशा अनेक शंकां मनात घोंगावत असते. पण तुम्हाला माहीत आहे का, की अशा वेळी तुमच्यासोबत कोणती व्यक्ती उभी आहे, यावरच तुमचे यश अवलंबून असते? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच्या भागात आपण लेखक रवींद्र देसाई यांच्या 'प्रभावी भाषण कला' या लोकप्रिय पुस्तकातील एका महत्त्वपूर्ण प्रकरणाचा वेध घेत आहोत. भाषण करायला जाताना सोबत नक्की कोणाला न्यावे? हा वरवर सोपा वाटणारा प्रश्न किती गहन आहे, हे लेखकाने यात सुंदररीत्या स्पष्ट केले आहे. वक्तृत्व स्पर्धेची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारे पालक यांच्यासाठी हे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे. भाषण कलेतील हे गुपित जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
Explore listener stats, chart rankings, contacts and more on the ग्रंथप्रेमी - Granthpremi podcast page.