
The episode features mountaineer Anand Mali discussing the dangers and challenges of climbing Kangchenjunga.
या पॉडकास्ट मध्ये आपल्यासोबत आहेत 'एव्हरेस्ट वीर' आणि गिर्यारोहक आनंद माळी. जगातलं तिसरं सर्वोच्च आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वात अवघड असे 'कांचनजुंगा' शिखर सर करताना त्यांच्यावर नेमके कोणते प्रसंग ओढवले, 'रेनिंग रॉक्स' (वरुन कोसळणारे दगड) आणि मृत्यूचं दुसरं नाव असलेल्या 'हँगिंग ग्लेशियर' मधून वाट काढताना आलेल्या अडचणी, जेव्हा एका मिनिटाच्या चुकीमुळे जीव जाऊ शकतो, अशा वेळी गिर्यारोहक नेमका काय निर्णय घेतात? हे सगळे थरारक अनुभव त्यांनी शेअर केले आहेत. आनंद यांच्या 'Kangchenjunga : Summit of My Dreams' या नवीन पुस्तकाच्या निमित्ताने झालेली ही चर्चा तुम्हाला खिळवून ठेवणारी आहे. महत्वाचे मुद्दे १. कांचनजुंगा: जगातलं सर्वात धोकादायक शिखर: एव्हरेस्टपेक्षाही कांचनजुंगा सर करणं अधिक कठीण का मानलं जातं? तिथलं हाड गोठवणारं तापमान, तीव्र चढण आणि दोन महिने चालणारा जीवघेणा संघर्ष याबद्दलची सविस्तर माहिती. २. 'रेनिंग रॉक्स' आणि 'हँगिंग ग्लेशियर' : पर्वतावरून अचानक सुटणारे दगड (Raining Rocks) आणि कधीही कोसळू शकणारे Hanging Glaciers यांमधून मार्ग काढताना एका सेकंदाची चूक कशी जीव घेऊ शकते, याचा थरारक अनुभव. ३. 'फ्रॉस्टबाईट' (Frostbite) म्हणजे काय? : अतिथंडीमुळे शरीराचे अवयव कसे निकामी होतात (Frostbite), ते टाळण्यासाठी गिर्यारोहक कोणती काळजी घेतात आणि नवशिक्या गिर्यारोहकांच्या कोणत्या चुकांमुळे…
Host: Dwitiya Sonawane
Guest: आनंद माळी
Books & works: Kangchenjunga : Summit of My Dreams
Places: कांचनजुंगा, एव्हरेस्ट
Explore listener stats, chart rankings, contacts and more on the ग्रंथप्रेमी - Granthpremi podcast page.