मुलींच्या मृत्यूला सासरच नाही, तर माहेरपण जबाबदार! | The Dark Reality of Patriarchy| डॉ. गीताली वि म | Granthpremi मराठी

मुलींच्या मृत्यूला सासरच नाही, तर माहेरपण जबाबदार! | The Dark Reality of Patriarchy| डॉ. गीताली वि म | Granthpremi मराठी

January 23, 2026 · 1h 7m · Season 1 · Episode 68

About this episode

In this episode, Dr. Geetali Vi. Ma. discusses the dark realities of patriarchy and the societal responsibilities surrounding women's struggles.

शिक्षण मिळालं, आर्थिक स्थैर्य आलं, तरीही सुखाच्या नावाखाली मुलींची घुसमट का? आजच्या काळात उच्चशिक्षित आणि स्वावलंबी मुली टोकाचं पाऊल का उचलत आहेत, या प्रश्नाचं अस्वस्थ करणारं उत्तर या भागात दडलंय. मिळून सार्‍याजणी या मासिकाच्या संपादक आणि कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. म. यांच्याशी मारलेल्या या गप्पा निव्वळ संवाद नाहीत, तर ते आरसा दाखवणारं वास्तव आहे. लग्नानंतर मुलीचं होणारं 'आदिम विस्थापन' (Primordial Displacement) म्हणजे नेमकं काय? ज्या घरात आपलं नाव, ओळख आणि अस्तित्वच पुसलं जातं, तिथे 'सहजीवन' कसं फुलणार? लग्नासाठी वडिलांनी केलेल्या खर्चाचं ओझं, मुलीला 'सहन' करायला कसं भाग पाडतं, यावर गीताली ताईंनी अतिशय मार्मिक भाष्य केलं आहे. या भागात तुम्ही काय पाहाल ? * चळवळ म्हणजे स्त्री विरुद्ध पुरुष नव्हे ? * स्त्री मृत्यूला सासरइतकंच 'माहेर' का जबाबदार असतं? * 'मिळून साऱ्या जणी' हे मासिक नव्हे तर चळवळ. * स्त्री चळवळीतून मिळालेलं आत्मभान आणि भविष्यातील आव्हाने. * पुरुषांना सक्षमीकरणाची गरज काय? हा व्हिडिओ प्रत्येक आई-वडिलांनी, मुलांनी आणि तरुण जोडप्याने आवर्जून पाहायला हवा. समाज बदलण्याची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरापासून कशी करायची, हे समजून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की पहा. Most people think Feminism is about "Women vs. Men." They’re wrong. In this episode, Dr. Geetali Vi. Ma. explains why…

People in this episode

Host: Dwitiya Sonawane

Guest: डॉ. गीताली वि म

Topics covered

Keywords

Mentioned in this episode

Organizations: मिलून साऱ्या जणी

More episodes of ग्रंथप्रेमी - Granthpremi

Explore listener stats, chart rankings, contacts and more on the ग्रंथप्रेमी - Granthpremi podcast page.